Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
स्पष्ट करा
कारण सांगा
Advertisements
उत्तर १
- सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते; परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराण व इंग्लंड या कोणाचीच नव्हती.
- ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष दयायला अमेरिका वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते.
- कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे, या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तान ही राष्ट्रे करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
shaalaa.com
उत्तर २
- सेंटो म्हणजे सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन.
- सेंटाेचे सुरुवातीचा नाव ‘बगदाद करार’ असे होते. हा शीतयुद्धकालीन करार होय.
- २४ फेब्रुवारी १९५५ रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान व इराक या राष्ट्रांनी सही केली.
- अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत करू लागली.
- सोव्हिएट रशियाने या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करायचा असे धोरण ठरले.
- परंतु प्रत्यक्षात, सदस्य राष्ट्रांपैकी कोणाकडेही लढण्याची लष्करी क्षमता नव्हती.
- ग्रेट ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास अमेरिकेलाही वेळ नव्हता.
- त्यामुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. करारान्वये एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपण स्वतंत्र धोरण राबवावे या मतावर राष्ट्रे आली.
- पुढे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडले आणि सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
shaalaa.com
नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
