मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टिप लिहा. अलिप्ततावाद - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिप लिहा.

अलिप्ततावाद

थोडक्यात टिपा लिहा:

अलिप्ततावाद

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

  1. कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे, या धोरणाला ‘अलिप्ततावाद’ असे म्हणतात.
  2. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे, याला ‘अलिप्ततावाद’ असे म्हणतात.
  3. अलिप्ततावादात स्वत:च्या राष्ट्राचा विकास स्वत:च करणे, स्वत:ची धोरणे स्वतःच ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो.
  4. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडित आहे.
shaalaa.com

उत्तर २

  1. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होता स्वतःचा विकास स्वतःच करणे, स्वतःची धोरणे ठरवून शांततेचा मार्ग अवलंबणे असे धोरण भारताने स्वीकारले. हे धोरण म्हणजे ‘अलिप्ततावाद’ होय.
  2. ‘नाम’च्या स्थापनेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.सुकार्नो (इंडोनेशिया), क्वामे नख्रुमा (घाना), गमाल अब्दुल नासेर (इजिप्त) आणि मार्शल टिटो (युगोस्लाव्हिया) यांनी पुढाकार घेतला.
  3. अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणावे ? ‘जी राष्ट्रे शांततामय सहजीवनाच्या आधारे, स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात, इतर परतंत्र देशातील स्वातंत्र्य संग्रामांना पाठिंबा देतात आणि महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारात किंवा महासत्तांशी द्‌विपक्षी करारात स्वतःला गुंतवून घेत नाहीत, त्यांना अलिप्ततावादी राष्ट्रे मानण्यात येते.’
  4. ‘अलिप्ततावाद’ ही कल्पना युद्धापेक्षा शांततेशी निगडीत आहे म्हणून ती विधायक आहे.
shaalaa.com
अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q ४.२ | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×