Advertisements
Advertisements
प्रश्न
ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ______.
पर्याय
त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.
हा लष्करी करार होता.
हा गुप्त करार होता.
हा फक्त मित्रदेशांतील करार होता.
Advertisements
उत्तर
ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू दयायचे नव्हते.
स्पष्टीकरण:
दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. याचा अर्थ स्पष्टच होता की त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.
