हिंदी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सेंटो करार विसर्जित करण्यात आला.

स्पष्ट कीजिए
कारण बताइए
Advertisements

उत्तर १

  1. सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते; परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराण व इंग्लंड या कोणाचीच नव्हती.
  2. ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष दयायला अमेरिका वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते.
  3. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे, या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तान ही राष्ट्रे करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
shaalaa.com

उत्तर २

  1. सेंटो म्हणजे सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन.
  2. सेंटाेचे सुरुवातीचा नाव ‘बगदाद करार’ असे होते. हा शीतयुद्धकालीन करार होय.
  3. २४ फेब्रुवारी १९५५ रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान व इराक या राष्ट्रांनी सही केली.
  4. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत करू लागली.
  5. सोव्हिएट रशियाने या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करायचा असे धोरण ठरले.
  6. परंतु प्रत्यक्षात, सदस्य राष्ट्रांपैकी कोणाकडेही लढण्याची लष्करी क्षमता नव्हती.
  7. ग्रेट ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास अमेरिकेलाही वेळ नव्हता.
  8. त्यामुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. करारान्वये एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपण स्वतंत्र धोरण राबवावे या मतावर राष्ट्रे आली. 
  9. पुढे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडले आणि सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
shaalaa.com
नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q ५.१ | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×