Advertisements
Advertisements
प्रश्न
P हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा AB ही एका स्पर्शिकेला समांतर आहे आणि स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला तिच्या मध्यबिंदूत छेदते. जर AB = `16sqrt3`, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.
Advertisements
उत्तर
पक्ष: जीवा AB || स्पर्शिका XY
AB = `16sqrt3` एकक
PQ वर्तुळाची त्रिज्या r आहे.
PC = CQ
साध्य: वर्तुळाची त्रिज्या - l(PQ)
रचना: रेख PB जोडा.
उकल:
सोबतच्या आकृतीत, ∠PQY = 90° …(i) [स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]
जीवा AB || रेषा XY ............[पक्ष]
∴ ∠PCB ≅ ∠PQY .............[संगत कोन]
∴ ∠PCB = 90° .........(ii) [(i) वरून]
आता, CB = `1/2`AB
∴ CB = `1/2 xx 16sqrt3` ................[वर्तुळकेंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो.]
CB = `8sqrt3` एकक ..............(iii)
वर्तुळाची त्रिज्या x …(iv)
∴ PQ = x
∴ PC = `1/2 "PQ"` ................[∵ PC = CQ, P – C – Q]
∴ PC = `1/2`x .........(v)
ΔPCB मध्ये, ∠PCB = 90° ...............…[(ii) वरून]
∴ PB2 = PC2 + CB2 ............[पायथागोरसचे प्रमेय]
∴ `x^2 = (1/2x)^2 + (8sqrt3)^2` ...........[(iii), (iv) आणि (v) वरून]
∴ `x^2 = x^2/4 + 64 xx 3`
∴ 4x2 = x2 + 192 × 4
∴ 4x2 – x2 = 768
∴ 3x2 = 768
∴ `x^2 = 768/3`
∴ x2 = 256
∴ x = 16 एकक ..............…[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ वर्तुळाची त्रिज्या 16 एकक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?
प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
‘एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन ______ असला पाहिजे’, या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
सोबतच्या आकृतीत, केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर सिद्ध करा, त्रिज्या XA || त्रिज्या YB. खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा.
रचना : रेख XZ आणि ______ काढले.
सिद्धता : स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार, बिंदू X, Z, Y हे ______ आहेत.
∴ ∠XZA ≅ ______ विरुद्ध कोन
∠XZA = ∠BZY = a मानू ______ (I)
आता, रेख XA ≅ रेख XZ ______(______)
∴ ∠XAZ = ______ = a ______ (समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय) (II)
तसेच रेख YB ≅ ______ ______(______)
∴ ∠BZY = ______ = a ______(______) (III)
∴ (I), (II) व (III) वरून,
∠XAZ = ______
∴ त्रिज्या XA || त्रिज्या YB ______(______)
आकृती मध्ये, केंद्र X व Y असणारी अंतर्स्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा - रेख AX || रेख BY.
एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील?
सोबतच्या आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे. रेख CF ⊥ जीवा DE आणि DE = 16 सेमी, तर DF ची लांबी काढा.
सोबतच्या आकृतीत, केंद्र A असलेल्या वर्तुळाला रेषा MN बिंदू M मध्ये स्पर्श करते. जर AN = 13 तसेच MN = 5 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.
आकृतीमध्ये, `square`ABCD च्या बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा केंद्र O आहे. जर AD ⊥ DC तसेच BC= 38, QB = 27, DC = 25 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.
एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर त्या वर्तुळातील सर्वात मोठया जीवेची लांबी किती?
O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
- ∠CAT व ∠ABC ची मापे काढा व त्याचे कारण लिहा.
- ∠CAT व ∠ABC एकरूप आहेत का? स्पष्टीकरण लिहा.
