मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा. खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.

खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले.
घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

नामे: दिवस, अन्वर, बाग, मित्र, इरफान, आनंद, गप्पा, बॅडमिंटन, घरी, हात.

सर्वनामे: त्याला, त्याचा, त्या, त्यांनी, आपण, मला, तू.

विशेषणे: खूप, मनमुराद, भरपूर.

क्रियापदे: गेलां होता, दिसला, झाला, मारल्या, खेळले, म्हणाला, भेटलो, आहे, नव्हतं, घेतला, भेटायचं, खेळायचं.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: मकबरा - माझ्या मनातला! - कृती [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 मकबरा - माझ्या मनातला!
कृती | Q (५) | पृष्ठ १६

संबंधित प्रश्‍न

शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'


शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :

  1. बावनकशी सोने-  _________
  2. सोन्याची खाण - __________
  3. करमाची रेखा - ___________
  4. चतकोर चोपडी - _________

खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब् प्रत्ययघटित शब् पूर्णाभ्यस्त शब् अंशाभ्यस्त शब् अनुकरणवाचक शब्
         

खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.


खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.

थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती

दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

व्हावे- 


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मला लाडू आवडला.


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×