मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आशयसौंदर्य : 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये : साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे. “झरा" या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णत: ठसवला आहे.

shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.1: खोद आणखी थोडेसे - कृती [पृष्ठ ५८]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
पाठ 15.1 खोद आणखी थोडेसे
कृती | Q (५) (अ) | पृष्ठ ५८

संबंधित प्रश्‍न

‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संयमाने वागा - ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

सकारात्मक राहा - ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

उतावळे व्हा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

खूप हुरळून जा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संवेदनशीलता जपा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

धीर सोडू नका - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

4. काव्यसाैंदर्य. (२)

'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)

  1. नकारात्मक विचार करा. - ___________
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

2. तक्ता पूर्ण करा. (२)

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) 1)
2) 2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×