Advertisements
Advertisements
प्रश्न
‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिति क्षमतेला आवाहन केले आहे.
कवयित्रींच्या मते माती खाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही। आनंद तरंग।' ही अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______
गाणे असते मनी म्हणजे ______
आकृती पूर्ण करा.
कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
| (१) सारी खोटी नसतात नाणी | (अ) मनातील विचार व्यक्त करावेत. |
| (२) घट्ट मिटू नका ओठ | (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
| (३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (इ) सगळे लोक फसवे नसतात. |
| (४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
संयमाने वागा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
उतावळे व्हा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
खूप हुरळून जा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
यशाचा विजयोत्सव करा - ______
‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)
खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.
4. काव्यसाैंदर्य. (२)
'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
| काय करावे. | काय करू नये. |
| 1) | 1) |
| 2) | 2) |
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
