मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. मूठ मिटून कशालाम्हणायचे भरलेलीउघडून ओंजळीतघ्यावी मनातली तळी

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कवयित्री आसावरी काकडे यांच्या 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून जिद्द, चिकाटी व उमेद बाळगून कष्टाची कास धरली, तर यश प्राप्त होतेच हा अतिशय सकारात्मक संदेश मिळतो. जे वास्तव आहे त्याविषयी कोणताही भ्रम न ठेवता, उगाचच भ्रमक समजुती बाळगू नयेत. स्वत:मधील उणिवा जाणून घ्याव्यात. स्वत:मध्ये खोल उतरूनच आपल्याला आपल्या क्षमतांनी भरलेली तळी दिसतील. त्या सुप्त क्षमतांना जाग आणावी. आपली रीती ओंजळ त्याने भरून घ्यावी असा संदेश वरील पद्यपंक्तींतून कवयित्री देऊ पाहत आहे.
         प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दांतून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. 'मनातली तळी' या अर्थपूर्ण प्रतीकाचा वापर करून कवयित्री आपल्या कमतरतेला आपल्यातील सुप्त क्षमतांनी भरून काढण्याचा संदेश समर्पकरीतीने देत आहे.
         आंतरिक लयीमुळे कविता तालासुरात म्हणता येते. साध्या, सोप्या शब्दांच्या माध्यमातून ही कविता आपल्याला सकारात्मक संदेश देते.

shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.1: खोद आणखी थोडेस - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 15.1 खोद आणखी थोडेस
कृती क्रमांक १ | Q 2. (इ)

संबंधित प्रश्‍न

‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

सकारात्मक राहा - ______

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

उतावळे व्हा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नकारात्मक विचार करा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

खूप हुरळून जा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संवेदनशीलता जपा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

धीर सोडू नका - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 

‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.

‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

4. काव्यसाैंदर्य. (२)

'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)

  1. नकारात्मक विचार करा. - ___________
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

2. तक्ता पूर्ण करा. (२)

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) 1)
2) 2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय  (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×