Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
- औरंगजेब-बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला.
- शाहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही ताब्यात ठेवण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला.
- राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीपदाच्या गादीसाठी कलह होईल, आणि मराठ्यांचे सामर्थ्य खचले जाईल, असे आझमशाहाला वाटले.
म्हणून आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
