मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, मोठ्या नळाने टाकी भरण्यास x तास लागतात.

नंतर लहान नळाला टाकी भरण्यासाठी (x + 5) तास लागतात.

∴ मोठ्या नळाने टाकीचा `1/x` भाग 1 तासात भरतो आणि लहान नळाने टाकीचा `1/(x+5)` भाग 1 तासात भरतो.

∴ दोन्ही नळ मिळून टाकीचा `(1/x + 1/(x + 5))` भाग 1 तासात भरतात.

परंतु, टाकी दोन्ही नळांच्या साहाय्याने 6 तासांत पूर्ण भरते.   ...(दिलेले)

∴ दोन्ही नळ मिळून टाकीचा `1/6` भाग 1 तासात भरेल.

दिलेल्या अटीनुसार,

∴ `1/x+1/(x+5)=1/6`

∴ `(x+5+x)/(x(x+5))=1/6`

∴ `(2x+5)/(x^2+5x)=1/6`

∴ 6(2x + 5) = x2 + 5x

∴ 12x + 30 = x2 + 5x

∴ x2 + 5x − 12x − 30 = 0

∴ x2 − 7x − 30 = 0

∴ x2 − 10x + 3x − 30 = 0   `...[(-30), (/   \backslash),((-10, 3)),(-10 xx 3 = -30),(-10 + 3 = -7)]`

∴ x(x − 10) + 3(x − 10) = 0 

∴ (x − 10) (x + 3) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ x − 10 = 0 किंवा x + 3 = 0

∴ x = 10 किंवा x = −3

∴ x = −3 ही किंमत अग्राह्य मानू; कारण वेळ ऋण नसते.

∴ x = 10 ही किंमत ग्राह्य आहे.

∴ x + 5

= 10 + 5

= 15

∴ मोठ्या नळाने टाकी भरण्यास 10 तास आणि लहान नळाने टाकी भरण्यास 15 तास लागतील.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.


विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?


श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक ₹ 40 असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितीमूल्य ₹ ६०० असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


समलंब मध्ये `square`ABCD मध्ये AB || CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.

उकल:

`square`ABCD समलंब चौकोन आहे. AB || CD

`"A"(square "ABCD") = 1/2 xx ("AB" + "CD") xx square`

∴ `33 = 1/2(x + 2x + 1) xx square`

∴ `square` = (3x + 1) × `square`

∴ 3x+ `square` - `square` = 0

∴ 3x (____) + 10 (____) = 0 

∴ (3x + 10)(_____) = 0

∴ (3x + 10) = 0  किंवा  `square` = 0

∴ x = `- 10/3` किंवा x = `square`

परंतु, लांबी ऋण नसते.

∴ `x ne (- 10)/3`   ∴  x = `square`

AB = ______, CD = ______, AD = BC = _______


दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.


एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?


मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.


पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×