मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बिंदू A, B आणि C केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB = 36, BC = 32 आणि CA = 30 असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू A, B आणि C केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB = 36, BC = 32 आणि CA = 30 असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

पक्ष: AB = 36, BC = 32, CA = 30

काढा : प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या

उकल:

समजा, x, y, z या अनुक्रमे केंद्र A, B व C असणाऱ्या वर्तुळांच्या त्रिज्या आहेत.

AP = RA = x, PB = BQ = y, CR = QC = z

AB = AP + PB …[A – P – B]

∴ 36 = x + y ........…(ii)[(i) व पक्ष वरून]

∴ BC = BQ + QC …[B – Q – C]

∴ 32 = y + z .....(iii) [(i) व पक्ष वरून]

CA = CR + RA …[C – R – A]

∴ 30 = z + x .........(iv) [(i) व पक्ष वरून]

आता, 

AB + BC + CA = 36 + 32 + 30

∴ (AP + PB) + (BQ + QC) + (CR + RA) = 98 …[A – P – B, B – Q – C, C – R – A]

∴ (x + y) + (y + z) + (z + x) = 98 .......[(i) वरून]

∴ 2x + 2y + 2z = 98

∴ 2(x + y + z) = 98

∴ x + y + z = `98/2`

∴ x + y + z = 49

∴ (x + y) + z = 49

∴ 36 + z = 49 ..............[(ii) वरून]

∴ z = 49 – 36

∴ z = 13 .................(v)

y + z = 32 ................[(iii) वरून]

∴ y + 13 = 32 ..............[(v) वरून]

∴ y = 32 – 13

∴ y = 19

z + x = 30 ........[(iv) वरून]

∴ 13 + x = 30 ....................[(v) वरून]

∴ x = 30 – 13

∴ x = 17

shaalaa.com
वर्तुळाची संकल्पना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: वर्तुळ - Q ८

संबंधित प्रश्‍न

प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?


सोबतच्या आकृतीत रेख MN ही केंद्र O असलेेल्या वर्तुळातील जीवा आहे. MN = 25, जीवा MN वर बिंदू L असा आहे की ML = 9 आणि d(O,L) = 5 तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

 


एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील?


सोबतच्या आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे. रेख CF ⊥ जीवा DE आणि DE = 16 सेमी, तर DF ची लांबी काढा. 

 


सोबतच्या आकृतीत, केंद्र A असलेल्या वर्तुळाला रेषा MN बिंदू M मध्ये स्पर्श करते. जर AN = 13 तसेच MN = 5 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

 


एका वर्तुळाच्या केंद्रापासून 15 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 12 सेमी असेल, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा.


सोबतच्या आकृतीत, बिंदू M वर्तुळ केंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = `6sqrt3`, तर

  1. वर्तुळाची त्रिज्या काढा.
  2. ∠K आणि ∠M

 


आकृतीमध्ये, जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर ∠ABE = 100° आणि m(कंस AE) = 95°, तर m(कंस DC) काढा. 


आकृतीमध्ये, P केंद्र असलेले वर्तुळ O केंद्र असलेल्या अर्धवर्तुळाला Q व C बिंदूंत स्पर्श करते. जर व्यास AB = 10, AC = 6 असेल, तर लहान वर्तुळाची त्रिज्या x किती?

 


O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते.

खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. ∠CAT व ∠ABC ची मापे काढा व त्याचे कारण लिहा.
  3. ∠CAT व ∠ABC एकरूप आहेत का? स्पष्टीकरण लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×