मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे,

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, कुशल कामगाराचा रोजगार ₹ x व अकुशल कामगाराचा रोजगार ₹ y आहे.

दिलेल्या पहिल्या अटीनुसार, कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे.

`x/y = 5/3`

∴ 3x = 5y

∴ 3x - 5y = 0    ....(i)

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, दोघांचा एका दिवसाचा पगार 720 रुपये आहे.

x + y = 720

∴ 5x + 5y = 3600   ...(ii)  [दोन्ही बाजूंना 5 ने गुणून]

समीकरण (i) व (ii) ची बेरीज करून,

    3x - 5y  = 0
+ 5x + 5y = 3600
    8x  =  3600

∴ x = `3600/8` = 450

x = 450 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

3x - 5y = 0

3(450) - 5y = 0

∴ 1350 = 5y

∴ y = `1350/5` = 270

∴ कुशल कामगाराचा रोजगार ₹ 450, तर अकुशल कामगाराचा रोजगार ₹ 270 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 7. (5) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.


वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.


विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?


कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व ७ किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला, तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्राम दर काढा.


समीकरणे सोडवून उत्तर लिहा.

100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`


मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.


एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर ३० किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे २० मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?


एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?


एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा. 


कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×