हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] Official 2022-2023 SSC (English Medium) 10th Standard Question Paper Solution

Advertisements
Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] [Official]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)

Academic Year: 2022-2023
Date & Time: 19th July 2023, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना:

  1. सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेननेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नवेत.
  4. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

विभाग १ - गद्य: १२ गुण
[12]1
[6]1.A

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

(१) आकृती पूर्ण करा:    [२]

होतं असं, की जहिराचे बूट अगदी जुने, जीर्ण झालेले असतात; पण जहिराला शाळेत बूट घालून जाणं अनिवार्य असल्यामुळं, अली तेच बूट पुन्हा एकदा शिवायला घेऊन जातो. त्याच वेळी आईनं उधारीवर भाजी आणायला सांगितल्यानं जहिराचे बूट दुकानाच्या दर्शनी भागातल्या एका खोबणीत ठेवून अली आत जातो. उधारीवर कांदे, बटाटे मागितल्यानं अलीला अर्थातच दुकानदाराची बोलणी खावी लागतात. बाहेर येतो तर बूट गायब झालेले असतात. कचरा गोळा करणारे लोक ते 'टाकाऊ' बूट गाडीत टाकून देतात.

अलीला कमालीचा धक्का बसतो. घरी आल्यावर घडलेली सर्व हकिकत तो जहिराला सांगतो. आता बूटच नसल्यानं जहिरानं शाळेत जायचं कसं, हा यक्षप्रश्न दोघा भावंडांपुढे उभा राहतो.

(२) 'धक्का' हे उत्तर येईल असा प्रश्‍न तयार करा.    [१]

(३) धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.    [३]

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]1.B

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:   

(१) आकृती पूर्ण करा:     [२]

तो सगळीकडे जमवून घेणारा माणूस होता. फक्त त्याची एकच अपेक्षा असे, की रात्री निवांत झोपता यावे; पण ते डास तेवढीही इच्छा पुरी होऊ देत नसत. त्याला काय म्हणावे? हा झोपला, की झालीच त्यांची गुणगुण सुरू. संध्याकाळीच खोलीची दारं, खिडक्या बंद ठेवून पाहिली. अंगाला मलम चोपडून, डासांना हटवण्यासाठीची अगरबत्ती जाळून, सगळं करून झालं. डास दाद देईनात. पंखा लावल्यावर मात्र जरा शांतता मिळू लागली; पण त्या ढणढण पंख्याचाही त्रास. अपरात्री जाग यायची. तो पंखा बंद करून टाकायचा. उकडायला लागलं, की दारं, खिडक्या उघडायचा. पंखा सुरू केला, तरी आलेले याचक काय सोडणार होते त्याला? इकडे डास जमातीतही याची चर्चा व्हायची. कसला हा चिंगूस माणूस?

(२) चौकटी पूर्ण करा:     [२]

  1. पंख्याचा आवाज - ______
  2. माणसाची अपेक्षा - ______

(३) उत्तरे लिहा:     [२]

  1. सगळीकडे जमवून घेणारा - ------
  2. डासांनी माणसाला दिलेले विशेषण - ------
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग २ - पद्य: ८ गुण
[8]2
[4]2.A

कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:   

(१) कोण ते लिहा:    [२]

  1. शेतकऱ्याच्या साथीला असणारे -
  2. शेतकऱ्यांवर कृपा करणारा -

हे आली रे आली, आली रे आली
सुगी आलीऽऽऽ
मेघराजानं किरपा केली रं
हे भल्लगडी दादा, भल्ल म्हण दादा।।धृ।।

काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे।।१।।

नटलं घरदार शिवार सारं
खेळं अंगणी सळसळतं वारं
बहुआनंदाने धरती न्हाली रे।।२।।

दोन हातांची किमया ही सारी
साथीला बेलं माझे खिल्लारी
केली दैवाने दौलत हवाली रे।।३।।

काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे ।।४।।

(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:    [२]

काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे।।

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2.B

कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा:

  1. नवनीताचे वैशिष्ट्य - ______
  2. सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - ______

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें ।।१।।

तो चि साधु ओळखावा। 
देव तेथें चि जाणावा।।२।।

मृदु सबाह्य नवनीत। 
तैसें सज्जनाचें चित्त ।।३।।

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं ।।४।।

दया करणें जें पुत्रासी।
ते चि दासा आणि दासी |।५।।

तुका म्हणे सांगू किती।
तो चि भगवंताची मूर्ती ।।६।।

(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं।।

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ३ - भाषाभ्यास : ८ गुण
[8]3
[4]3.A | व्याकरण घटकांवर आधारित कृती:
[2]3.A.i | काळ:
[1]3.A.i.1

कंसातील सूचनेनुसार कृती करा:

वयाच्या नवव्या वर्षी मी शाळेत गेले. (भविष्यकाळ करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]3.A.i.2

कंसातील सूचनेनुसार कृती करा:

मकबरा माझी वाट पाहत आहे. (काळ ओळखा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3.A.ii | वाक्प्रचार:

पुढील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) जिवापाड प्रेम करणे. (अ) नजर ठेवणे.
(ii) ललकारी देणे. (आ) खूप प्रेम करणे.
  (इ) गर्जना करणे.
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]3.B | भाषिक घटकांवर आधारित कृती:
[2]3.B.i | शब्दसंपत्ती:
[1]3.B.i.1

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष = 

Concept: undefined - undefined
Chapter:

पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:

सागर = 

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.B.i.2

पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द बनवा:

कलात्मकता → ------ , ------

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.B.ii | लेखननियमांनुसार लेखन:

अचूक शब्द ओळखून लिहा:

अवर्णनीय

अर्वणनीय

अवर्ननीय

अवर्णणीय

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.B.iii
[0.5]3.B.iii.1

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

विरामचिन्ह विरामचिन्हाचे नाव
. .............
Concept: undefined - undefined
Chapter: [16] व्याकरण विभाग
[0.5]3.B.iii.2

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

विरामचिन्ह विरामचिन्हाचे नाव
: ------
Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
विभाग ४ - उपयोजित लेखन : १२ गुण
[12]4 | पुढील कृती सोडवा:
[4]4.A | पुढील निवेदन वाचून पत्रलेखन करा:
[4]4.A.i

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.A.ii

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.B | पुढीलपैकी कोणतीही एक कुली सोडवा:
[4]4.B.i | गद्य आकलन:

पुढील उतारा वाचून त्यावर चार असे प्रश्‍न तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील:

तुम्हांला मनातून वाटतं ना आपल्याला सुखी जीवनाचा आनंद घ्यायचाय. मग द्वेषाचा त्याग करा. अतिशय नम्रपणा स्वीकारा. द्वेषाची जळमटं मुळातून काढून फेका. आता शांतपणे स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघा. बघा काय दिसतंय ते. तिथं तुम्हांला नीरव शांततेचा अनुभव येईल. एकदम नव्या आणि सुंदर जगात प्रंवेश केल्याचा अनुभव येईल. शांतता कुठं बाहेर नसून ती स्वतःमध्येच आहे, याची अनुभूती होईल. बस, हीच शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्याचा द्वेष करून स्वतःचा रक्‍तदाब वाढवून घेऊ नका.
Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.B.ii | जाहिरातलेखन:

पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा:

चौकटी पूर्ण करा:

  1. औषधाचे नाव → ______
  2. औषध निर्माण करणारी कंपनी → ______
  3. औषधाचे वैशिष्ट्य → ______
  4. औषध कंपनीचा पत्ता → ______
Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.B.iii | बातमीलेखन:

पुढील निवेदन वाचा व किलबिल बाल-उद्यानात संपन्न झालेला 'स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव' या कार्यक्रमाची बातमी लिहा:

सर्व जनतेला हार्दिक निमंत्रण!!!

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव...

अध्यक्ष: मा. नामदेव गावस्कर (माजी सैनिक)

प्रमुख पाहुणे: डॉ. वर्षा कुंबळे (पर्यावरण तज्ज्ञ)

वेळ: सकाळी ९.०० वाजता 

स्थळ: किलबिल बाल-उद्यान, भिलगाव, वर्धा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.B.iv | कथालेखन:

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:

[मुद्दे: एक गावकरी - तीर्थयात्रेला जाणे - स्वतःजवळचे दागिने शेजारच्या व्यापाऱ्याजवळ ठेवणे - परत आल्यावर व्यापाऱ्याकडून नकार - 'दागिने उंदरांनी खाल्ले' - गावकऱ्याने सावकाराच्या (व्यापाऱ्याच्या) मुलाला लपवणे - 'फुलपाखरांनी नेले' - व्यापाऱ्याने चूक कबूल करणे.]

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.C | पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा:
[4]4.C.i | वर्णनात्मक:

पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.C.ii | आत्मकथन:

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions






















Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] with solutions 2022 - 2023

     Maharashtra State Board 10th Standard question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard question paper 2023 serve as a catalyst to prepare for your Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2023 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.

How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×