हिंदी

कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा: (१) कोण ते लिहा: [२] शेतकऱ्याच्या साथीला असणारे - शेतकऱ्यांवर कृपा करणारा - हे आली रे आली, आली रे आलीसुगी आलीऽऽऽ - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:   

(१) कोण ते लिहा:    [२]

  1. शेतकऱ्याच्या साथीला असणारे -
  2. शेतकऱ्यांवर कृपा करणारा -

हे आली रे आली, आली रे आली
सुगी आलीऽऽऽ
मेघराजानं किरपा केली रं
हे भल्लगडी दादा, भल्ल म्हण दादा।।धृ।।

काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे।।१।।

नटलं घरदार शिवार सारं
खेळं अंगणी सळसळतं वारं
बहुआनंदाने धरती न्हाली रे।।२।।

दोन हातांची किमया ही सारी
साथीला बेलं माझे खिल्लारी
केली दैवाने दौलत हवाली रे।।३।।

काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे ।।४।।

(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:    [२]

काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे।।

आकलन
Advertisements

उत्तर

    1. शेतकऱ्याच्या साथीला असणारे - बैल 
    2. शेतकऱ्यांवर कृपा करणारा - मेघराज
  1. शेतावरील धान्याची भरभराट पाहून आनंदित झालेले शेतकरी म्हणतात - आम्हां कुणालाही आता कशाचीही कमतरता नाही. आम्हीच आमचे मालक आहोत. आता आमचेच राज्य आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×