Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

Advertisements
उत्तर
मी वृक्ष बोललोय!
हे वाटसरूंनो, या ना, या माझ्या सावलीत थोडावेळ विसावा घ्या. माझ्या मनात खूप काही सांगण्याची इच्छा आहे. ऐकताय ना? तर ऐका.
तुम्ही आता बसलेले आहात तो पार वाटसरूंना थोडा विसावा देणारा! माझ्या सान्निध्यात येणाऱ्यांना थोडं सुख मिळतं. इथे नेहमी बायका, मुले आणि विविध प्रकारचे लोक ये-जा करत असतात. मुले आनंदाने खेळत असतात, बायका आपापसात सुखदुःखांची देवाणघेवाण करतात, काही लोक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. माझ्यावर चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांमुळे, मी एका जागी असतानाही बाहेरच्या जगाच्या बातम्या ऐकतो.
आम्ही झाडे माणसांना हवी ती मदत करतो. आमच्या प्रत्येक भागाचा उपयोग माणूस वेगवेगळ्या प्रकारे करतो. चविष्ट फळे, उपयोगी पाने, फांद्या, खोड सरपण, फर्निचर, कागद तयार करण्यासाठी वापरले जातात. आम्ही हवा स्वच्छ ठेवतो, भूगर्भातील पाणीसाठे टिकवून ठेवतो आणि पर्यावरणाचा समतोल राखतो. हे सर्व काही आम्ही फक्त माणसांसाठी करतो. स्वतःसाठी काहीच नाही!
पण दुर्दैवाने माणसे आमच्याशी विश्वासघात करतात. आम्हाला म्हणजेच निसर्गाला मदत न करता उलट जंगलतोड करून आमच्यावरच कुर्हाडीचे घाव घालतात. तात्काळ लाभासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी हे करत असता. यामुळे पुढे भयंकर दुष्काळ, मृत्यू आणि निसर्गातील असमतोल यांना सामोरे जावे लागते. ही माणसाच्या कर्माचीच फळे आहेत. जर आता सुधारले नाही, तर सर्व सृष्टीच नष्ट होईल. म्हणून हे वाटसरूंनो, तुम्ही इतरांना हे समजावून सांगाल का?
