Advertisements
Advertisements
प्रश्न
Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook.
Climax
Advertisements
उत्तर
कथेचा परमोच्च बिंदू (Climax):
आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी राजा जंगलात राहणाऱ्या विद्वान यतींकडे गेला. त्यावेळी तेथे त्याला एक जखमी माणूस दिसला. राजाने त्या माणसाची सेवा-सुश्रूषा केली. दिवसभराच्या धावपळीमुळे थकलेला राजा यतींच्या झोपड़ीमध्ये त्या जखमी व्यक्तीच्या शेजारीच झोपी गेला. सकाळी त्याला जाग आल्यावर त्या जखमी माणसाने राजाची माफी मागितली. आपण व्यक्तिगत वैमनस्यातून राजाला मारण्याच्या हेतूने आलो असल्याचे त्याने राजाला सांगितले. आपल्याला जीवानिशी मारायला आलेला माणूस एवढ्या सहजपणे आपला मित्र झाल्याचे जाणवून राजाला खूप आनंद झाला. हा या कथेचा परमोच्च बिंदू म्हणजेच Climax आहे.
