Advertisements
Advertisements
प्रश्न
राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ?
योग
Advertisements
उत्तर
अमितने सायकल विकली तेव्हा त्याला नफा किंवा तोटा झाला नाही, म्हणजेच
अमितची सायकल खरेदी किंमत + दुरुस्ती खर्च = विक्री किंमत
∴ अमितची सायकल खरेदी किंमत + 54 रुपये (दुरुस्ती खर्च) = 1134 रुपये (विक्री किंमत).
अमितची सायकल खरेदी किंमत = 1134 रुपये − 54 रुपये.
∴ अमितची सायकल खरेदी किंमत = 1080 रुपये.
राजुने सायकल 8% नफ्याने अमितला विकली, म्हणजेच
राजुची सायकल खरेदी किंमत = `(1080 xx 100)/108`
राजुची सायकल खरेदी किंमत = `1080/1.08`
राजुची सायकल खरेदी किंमत = 1000 रुपये.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
