मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ?

बेरीज
Advertisements

उत्तर

अमितने सायकल विकली तेव्हा त्याला नफा किंवा तोटा झाला नाही, म्हणजेच

अमितची सायकल खरेदी किंमत + दुरुस्ती खर्च = विक्री किंमत

∴ अमितची सायकल खरेदी किंमत + 54 रुपये (दुरुस्ती खर्च) = 1134 रुपये (विक्री किंमत).

अमितची सायकल खरेदी किंमत = 1134 रुपये − 54 रुपये.

∴ अमितची सायकल खरेदी किंमत = 1080 रुपये.

राजुने सायकल 8% नफ्याने अमितला विकली, म्हणजेच

राजुची सायकल खरेदी किंमत = `(1080 xx 100)/108`

राजुची सायकल खरेदी किंमत = `1080/1.08`

राजुची सायकल खरेदी किंमत = 1000 रुपये.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 8. | पृष्ठ ६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×