Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे:
- डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेल्या पुरवठ्याच्या नियमानुसार, “इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या अधिक किमतीला वस्तूच्या जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला वस्तूच्या कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो.”
- पुरवठ्याचा नियम पुढील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येतो:

- वरील आकृतीवरून असे दिसून येते की, वस्तूची किंमत ‘अक’ पासून ‘अक१’ पर्यंत वाढल्यास वस्तूचा पुरवठा ‘अब’ पासून ‘अब१’ पर्यंत जास्त होतो. त्याचप्रमाणे, वस्तूची किंमत ‘अक’ पासून ‘अक२’ पर्यंत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा ‘अब’ पासून ‘अब,’ पर्यंत कमी होतो. म्हणजेच ‘पप’ हा पुरवठा वक्र वस्तूची किंमत व वस्तूचा पुरवठा यांमधील सम संबंध दर्शवतो. म्हणून पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
