हिंदी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

स्पष्ट कीजिए
कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय.
  2. इंग्‍लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती. तेथे लोहखनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होते.
  3. इंग्लंडमधील दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे जाते. त्‍यामुळे सुती कापडाचा उद्योग तेथे भरभराटीस आला.
  4. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला सहज शक्‍य झाले.
  5. नाविक सामर्थ्याच्या जोरावर हा कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्‍क्‍या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला.
  6. मिळणाऱ्या नफ्यातून इंग्‍लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्‍त भांडवल उपलब्ध झाले.
  7. याच्याच जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्‍ध असल्‍याने वस्‍तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे शक्‍य झाले.
  8. या सर्व घटकांनी इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीसाठी पायाभूत सुविधा तयार केली, ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली.
  9. वरील कारणांमुळे औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली.
shaalaa.com
औद्योगिक क्रांती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ५.२ | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×