मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. इंग्लंडमध्ये औद्योगिकीकरणासाठी लागणारे लोहखनिज व कोळसा यांचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
  2. इंग्लंड मधील दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सुलभ झाले, परिणामी सुती कापड उद्योगाची मोठी भरभराट झाली.
  3. इंग्लंडच्या विशाल साम्राज्यविस्तारामुळे वसाहतींमधून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल मिळवणे शक्य झाले.
  4. आपल्या प्रबळ नाविक सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून तो वसाहतींच्या बाजारपेठेत विकला.
  5. आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळालेल्या नफ्यामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल जमा झाले होते.
  6. कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी राहिला आणि वस्तूंची विक्री वाढण्यास मदत झाली.

अशा रितीने औद्योगिक क्रांतीला अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडकडे उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

shaalaa.com
औद्योगिक क्रांती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ५.२ | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×