हिंदी

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: परमोच्च विश्वासाचे तत्त्व. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

परमोच्च विश्वासाचे तत्त्व.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. विमा उतरवण्याचा हेतू म्हणजे नुकसानभरपाई मिळवणे हा असतो. त्यामुळे विम्याचा करार करताना विमेदार व विमा कंपनी या दोन्ही पक्षांनी विम्याशी संबंधित अशी सर्व माहिती एकमेकांना स्पष्ट, सत्य व असंदिग्ध भाषेत देणे आवश्यक असते, यालाच परमोच्च विश्वास (किंवा परस्पर विश्वास) तत्त्व म्हणतात.
  2. जर विमेदाराने काही माहिती खोटी किंवा अवास्तव सांगितली किंवा काही माहिती हेतुपुरस्सर गुप्त ठेवली असे आढळून आले, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास बंधनकारक नसते. विमा कंपनीनेसुद्धा हे तत्त्व पाळले पाहिजे.
  3. विमा कंपनीने देखील विमेदाराला विम्याचा करार व अटी यांसंबंधी संपूर्ण व खरी माहिती दिली पाहिजे.
  4. उदा., विमा उतरवते वेळी श्री. हरी यांनी त्यांच्या किडनी आजाराविषयी माहिती दिली नाही व त्यांच्या मृत्यूला जर ते कारण निष्पन्न झाले, तर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×