Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
परमोच्च विश्वासाचे तत्त्व.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- विमा उतरवण्याचा हेतू म्हणजे नुकसानभरपाई मिळवणे हा असतो. त्यामुळे विम्याचा करार करताना विमेदार व विमा कंपनी या दोन्ही पक्षांनी विम्याशी संबंधित अशी सर्व माहिती एकमेकांना स्पष्ट, सत्य व असंदिग्ध भाषेत देणे आवश्यक असते, यालाच परमोच्च विश्वास (किंवा परस्पर विश्वास) तत्त्व म्हणतात.
- जर विमेदाराने काही माहिती खोटी किंवा अवास्तव सांगितली किंवा काही माहिती हेतुपुरस्सर गुप्त ठेवली असे आढळून आले, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास बंधनकारक नसते. विमा कंपनीनेसुद्धा हे तत्त्व पाळले पाहिजे.
- विमा कंपनीने देखील विमेदाराला विम्याचा करार व अटी यांसंबंधी संपूर्ण व खरी माहिती दिली पाहिजे.
- उदा., विमा उतरवते वेळी श्री. हरी यांनी त्यांच्या किडनी आजाराविषयी माहिती दिली नाही व त्यांच्या मृत्यूला जर ते कारण निष्पन्न झाले, तर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
