Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील फरक स्पष्ट करा:
लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा व लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा.
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| अ. क्र. | लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा | लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा |
| १. | जन्मदर जास्त व मृत्युदरही जास्त असल्यामुळे लोकसंख्या स्थिर असणे हे लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. | जन्मदर कमी व मृत्युदरही कमी असल्यामुळे लोकसंख्या स्थिर असणे हे लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. |
| २. | जे देश लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यातून जात असतात त्या देशांमध्ये पुढील बाबी पाहायला मिळतात: (१) आर्थिक मागासलेपण (२) वैदकीय सोयी-सुविधांचा अभाव (३) कमी आयुर्मान (४) कमी साक्षरता दर (५) विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभाव (६) प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्यालोकांचे प्रमाण अधिक (७) द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अत्यल्प |
जे देश लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यातून जात असतात त्या देशांमध्ये पुढील बाबी पाहायला मिळतात: (१) अथथंव्यवस्थेचे आधुनिक स्वरूप (२) आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा (३) सवोच्च आयुर्मान (४) सर्वोच्च साक्षरता दर (५) उच्च दर्जाच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सोयी-सुविधा (६) प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रमाण नगण्य (७) द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असते. |
| ३. | सद्यःस्थितीत जगातील कोणताही देश या टप्प्यातून जाताना दिसत नाही. | सद्यःस्थितीत जगातील स्वीडन व फिनलँड हे देश या टप्प्यातून जाताना दिसतात. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
