Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा.

Advertisements
उत्तर
लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. हा गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही; तर विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील एका भागात Fe चे ऑक्सिडीकरण होऊन Fe2O3.H2O तयार होते व दुसऱ्या भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते.
१. धनाग्र भागात ॲनोडपाशी Fe चे ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ तयार होते.
\[\ce{Fe_{(s)} -> Fe^2+_{(aq)} + 2e^-}\]
२. ऋणाग्र भागात O2 चे क्षपण होऊन पाणी तयार होते.
\[\ce{O2_{(g)} + 4H^+_{(aq)} + 4e- -> 2H2O_{(l)}}\]
जेव्हा Fe2+ आयन्स धनाग्रापासून स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होऊन पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3+ आयन्स तयार होतात.
Fe3+ आयरन अविद्राव्य सरलीकृत ऑक्साइड, जो लाल-तांबूस रंगाचा असतो, तो तयार करतात. ज्याला गंज म्हणतात. तो पृष्ठभागावर जमा होतो.
\[\ce{2Fe^3+_{(g)} + 4H2O_{(l)} -> Fe2O3.H2O_{(s)} + 6H^+_{(aq)}}\]
परिसरातील पदार्थांमुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते, यास क्षरण असे म्हणतात. लोखंडाचे क्षरण होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो. त्याला सामान्यतः गंज असे म्हणतात. यामुळे लोखंडाचे क्षरण असा शब्द न वापरता लोखंडाचे गंजणे असा शब्द वापरण्यात येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.
हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?
ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.
अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
पुढील तक्ता जुळवा.
| अभिकारके | उत्पादिते | रासायनिक अभिक्रियेचा प्रकार |
| BaCl2(aq) + ZnSO4(aq) | H2CO3(aq) | विस्थापन |
| 2AgCl(s) | FeSO4(aq) + Cu(s) | संयोग |
| CuSO4(aq) + Fe(s) | BaSO4 ↓+ ZnCl2(aq) | अपघटन |
| H2O(l) + CO2(g) | 2Ag(s) + Cl2(g) | दुहेरी विस्थापन |
दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा:
- बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
- फळ परिपक्व होणे.
- दुधाचे दह्यात रूपांतर होणे.
- पाण्याचे बाष्पीभवन होणे.
- जठरामध्ये अन्न पचणे.
- लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे.
