हिंदी

पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मागणी पत्र – (औपचारिक)

दिनांक: १० जून २०२१

प्रति,

माननीय.श्री. प्रसाद राजे

सरपंच (आयोजक), माझी वसुंधरा अभियान,

ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर,

ता. वरुड, जि. अमरावती  ४०००१७

विषय: 'वृक्षलागवडीकरता रोपांची मागणी करण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी स्नेहल करडे गावात राहणारा एक वृक्षमित्र या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. आपण सुरू केलेले 'माझी वसुंधरा अभियान' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या अभियानामार्फत दरवर्षी १००० वृक्षांची लागवड आपल्या आसपासच्या प्रदेशात केली जाते, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. निसर्गाचा ठेवा जोपासण्याच्या आपल्या या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा अशी माझी व माझ्या गावकऱ्यांची इच्छा आहे.

आमच्या गावाच्या बाजूलाच उघडे माळरान आहे. येथे वृक्षलागवडीकरता उत्तम जागा आहे. आमचे गाव हिरवळीने नटावे, पावसाच्या समस्या दूर व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. तरी आपण आपल्या या वसुंधरा वाचवण्याच्या अनोख्या अभियानात आम्हांला सामावून घ्याल अशी आशा बाळगतो.

वृक्ष लागवड कार्यक्रमाकरता आम्हांला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध रोपांचे प्रकारांनुसार प्रत्येकी ३ नग १४ जूनपर्यंत आपण पाठवून द्यावेत, जेणेकरून माळरानाच्या परिसरात विविध झाडांची लागवड आम्हांला पावसाळयाच्या प्रारंभीच करता येईल.

आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य अभियानात सहभागी करून घ्याल अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर आमच्या ग्रामपंचायतीच्या पत्त्यावर पाठवावीत ही नम्र विनंती.

कळावे,

आपली विश्वासू,

स्नेहल

वृक्षमित्र, मु. करडे,

पो. वनसे ता. वरुड

जि. अमरावती ४०००७१

[email protected]

किंवा

अभिनंदन पत्र – (औपचारिक)

दिनांक: २६ जून २०२१

प्रति,

माननीय सरपंच श्री. प्रसाद राणे

आयोजक- माझी वसुंधरा अभियान,

ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर,

ता. वरुड, जि. अमरावती ४०००७१

विषय: 'माझी वसुंधरा अभियानाचे' आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्याबाबत.

माननीय महोदय,

मी नम्रता आपल्या गावातील शारदा विद्यामंदिरातील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. १५ जून ते २५ जून या कालावधीत आपण आयोजित केलेले 'माझी वसुंधरा अभियान' हा एक स्तुत्य उपक्रम आहे. गेली पाच वर्षे आपण या अभियानाचे आयोजन करत आहात. यामुळे, आपला गाव व आजूबाजूची गावेही आता हिरवळीने नटली आहेत. आपल्या या पर्यावरणस्नेही कार्याकरता आपले मनापासून अभिनंदन.

आपण आयोजित केलेल्या या अभियानाला आता भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या अभियानासोबत अनेक गावे जोडली आहेत. आपण करत असलेले हे कार्य आम्हां विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरत आहे. आपल्या या कार्याबद्दल, उत्तम आयोजनाबद्दल मी शारदा विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपले हार्दिक अभिनंदन करतो.

कळावे,

आपली विश्वासू,

नम्रता 

विद्यार्थी प्रतिनिधी,

शारदा विद्यामंदिर, नवगाव, सातनूर,

ता. वरुड, जि. अमरावती

[email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q अ. ५.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q अ. ५.

संबंधित प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]

श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]

श्रेया/श्रेयस इनामदार, संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.


रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा. 


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×