हिंदी

खालील तक्ता पूर्ण करा. वाक्य वाक्यप्रकार केलेला बदल (१) दिलेल्या सूचनांचे पालन करा. ______ विधानार्थी करा. (२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

केलेला बदल

(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

______

विधानार्थी करा.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

______

विधानार्थी-नकारार्थी करा.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

______

विधानार्थी-होकारार्थी करा.

(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही.

______

आज्ञार्थी करा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

______

प्रश्नार्थक करा.

(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

______

आज्ञार्थी करा.

सारिणी
Advertisements

उत्तर

वाक्य

वाक्य प्रकार

केलेला बदल

(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

आज्ञार्थी वाक्य

विधानार्थी करा → दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

उद्गारार्थी वाक्य

विधानार्थी - नकारार्थी करा → तरुण मुलांनी खूप वेगाने वाहन चालवू नयेत.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

प्रश्नार्थी वाक्य

विधानार्थी - होकारार्थी करा → स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे.

(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही.

विधानार्थी - नकारार्थी वाक्य

आज्ञार्थी करा → मोबाइलचा अतिवापर टाळा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

विधानार्थी - नकारार्थी वाक्य

प्रश्नार्थी करा → खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?

(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

विधानार्थी वाक्य

आज्ञार्थी करा → विद्यार्थ्यांनो, संदर्भग्रंथांचे वाचन करा.

shaalaa.com
वाक्य व वाक्यांचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - वाक्यरूपांतर कृती 1 [पृष्ठ ११५]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 5.01 व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
वाक्यरूपांतर कृती 1 | Q 1 | पृष्ठ ११५

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१) अशी माणसं क्वचितच सापडतात.

 

नकारार्थी करा

(२) ती जुनी कौलारू वास्तू होती.

 

उद्गारार्थी करा

(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही?

 

आज्ञार्थी करा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. ____________


माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -


हा आनंद सर्वत्र असतो.

या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:


किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. वाक्य वाक्यप्रकार बदलांसाठी सूचना
(१) जमेल का हे सारं आपल्याला? ______ विधानार्थी करा
(२) तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. ______ उद्गारार्थी करा
(३) यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. ______ प्रश्नार्थक करा
(४) पुढील सगळे मार्ग बंदच होते. ______ नकारार्थी करा

खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

किती सुंदर देखावा आहे हा!


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

यावर्षी पाऊस खूप पडला.


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

तुझा आवडता विषय कोणता?


खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.


खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.


सूचनेप्रमाणे सोडवा:

जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

पडेल ते काम करा.


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

हो ताई! मला आठवतय!


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

तुम्ही सगळे कोण आहात?


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! (विधानार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

तुम्ही लष्करांच मनोबल खूप वाढवत आहात (उद्गारार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

काल फार पाऊस पडला. (प्रश्नार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

किती छान आहे हे फूल! (विधानार्थी करा)


आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी:

या वाक्यातील उपमान ओळखा. ______


'फितूर होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:


'फितूर होणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.


पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:

मुलांनो रांगेत चला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×