Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.
शीतयुद्धोत्तर काळातील जागतिक घडामोडींचा परिणाम स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
- शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय: शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली.
- एकध्रुवीयतेचा उदय: अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली.
- मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप: मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपांमध्ये वाढ झाली.
- दहशतवाद: ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर (ज्याला ९/११ हल्ला म्हणून ओळखले जाते) दहशतवादाचे स्वरूप बदलत गेल.
- बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद: या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला, इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
