हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते.
  2. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहन आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते.
  3. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी, इतर उद्योगांचा विकास झाला आहे.
  4. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
  5. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते.
  6. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे.
  7. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरीत्या मर्यादा आल्या आहेत.
  8. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
shaalaa.com
मानवी वस्ती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मानवी वस्ती - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 मानवी वस्ती
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ५१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 मानवी वस्ती
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×