Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
उत्तर
मी आरसा बोलतोय...
अरे वा! किती सुंदरपणे विचारांत हरवून गेलास! माणसांना स्वप्न दाखवणे हाच माझ्या जन्माचा हेतू आहे. असं इकडे तिकडे गोंधळून पाहू नकोस. मी तुझ्यासमोरचा आरसाच बोलतो आहे.
हे लक्षात ठेव, प्रत्येक माणसाला स्वतःवर सर्वाधिक प्रेम असते. इतरांपेक्षा वेगळे दिसावे म्हणून प्रत्येकजण काहीतरी नवीन आणि आगळीवेगळी कृती करण्याचा प्रयत्न करतो. याच धडपडीतून मानवाने पृथ्वीवर असंख्य पराक्रम साध्य केले आहेत. त्यामुळेच माणूस आज सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि या पृथ्वीवर अधिराज्य गाजवतो. प्रत्येक यशानंतर या पराक्रमी मानवांनी आरशात स्वतःकडे पाहून मुठी आवळत, हात उंचावून ‘माझा विजय असो’ अशी मनातल्या मनात घोषणा केलीच असेल. या प्रेरणेचा उगम मीच आहे. तुमच्या प्रगतीला दिशा देणारा मीच आहे.
आठवतंय का? जत्रेत आपली भेट झाली होती. त्या आरशांच्या महालात मी किती वेगवेगळ्या रूपांत दिसत होतो. तू तर खळखळून हसत होतास. तुझ्याच किती विचित्र प्रतिमा दिसत होत्या. कधी गोलमटोल, कधी अगदी सडपातळ, तर कधी फारच बुटकी. एका आरशात तर डोकं भोपळ्यासारखं मोठं आणि उरलेला देह केवळ दोन-अडीच फूट. त्या दृश्यावर सगळेच किती हसत होते.
लक्षात ठेव, ही माझी रूपं केवळ विनोदासाठी नाहीत. वाहनचालकाला मागून येणाऱ्या गाड्या दिसाव्यात म्हणून मीच गाडीच्या कडेला बसतो. विविध प्रकारची भिंगे ही माझीच रूपे आहेत. प्रयोगशाळेतील सूक्ष्मदर्शकापासून ते अवकाशातील ग्रहांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणीपर्यंत मीच कार्यरत असतो. घराघरांत, कपड्यांवर, दुकानांत, रस्त्यांवर, वाहनांमध्ये, जत्रांमध्ये सर्वत्र मीच असतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेव. मी कधीही स्वतःच्या गर्वात राहिलो नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा पाणी पिण्यासाठी नदीकाठी वाकला, तेव्हा त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले असणार. त्या क्षणापासून मी त्याच्या सोबत आहे. मी नेहमी स्वतःला बाजूला ठेवून माणसाच्या मदतीसाठी काम केले आहे. तूही अशीच मदत करत राहा. पाहशील, तू किती मोठा होशील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
नमुना कृती:

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
