मराठी

Revision: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board

Advertisements

Definitions [6]

व्याख्या लिहा.

पोषकतत्वे

आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके, स्निग्धपदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी अन्नघटक म्हणजे पोषकतत्त्वे होय.

व्याख्या लिहा.

पोषण

पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.

व्याख्या लिहा.

ग्लायकोलायसीस

पेशी द्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात, ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.

व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन

अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्याविना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते, त्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात.

व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन

ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय.

व्याख्या लिहा.

प्रथिने

अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला 'प्रथिने' म्हणतात.

Important Questions [13]

Advertisements
Advertisements
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×