Definitions [5]
व्याख्या लिहा.
आवर्त
आधुनिक आवर्तसारणीमधील सात आडव्या ओळींना 'आवर्त' असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
गण
आधुनिक आवर्तसारणीमधील अठरा उभ्या स्तंभांना 'गण' असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
विद्युत धनता
मूलद्रव्याच्या अणूच्या संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याच्या प्रवृत्तीला मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
अणुत्रिज्या
एका असंलग्न अणूमधील, अणूचे केंद्रक व बाह्यतम कवच यांमधील अंतरास अणुत्रिज्या असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
विद्युत ऋणता
मूलद्रव्याच्या अणूच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणायन बनण्याच्या प्रवृत्तीला मूलद्रव्याची विद्युत ऋणता असे म्हणतात.
Important Questions [18]
- वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू
- वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वाधिक विद्युतऋण अणू
- वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू
- डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा.
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.
- शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.
- कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा: (धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड) इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील
- व्याख्या लिहा. आवर्त
- एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: या मूलद्रव्याचा अणुअंक किती? या मूलद्रव्याचा गण कोणता? हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
- शास्त्रीय कारणे लिहा. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
- एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
- शास्त्रीय कारणे लिहा. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
- व्याख्या लिहा. गण
- सहसंबंध ओळखा. गण 1 : अल्कली धातू : : ______ : हॅलोजन
- अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ______ मध्ये आहे.
- वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वात लहान आकारमानाचा अणू
- आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत?
Concepts [8]
- मूलद्रव्यांचे वर्गीकरण (Classification of elements)
- डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
- न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम (Newlands’ Law of Octaves)
- मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
- आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
- गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
- आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण (Periods and electronic configuration)
- आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
