मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा.

आकृती
सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

चुंबकीय क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडे असे असल्याने त्याचा परिणाम AB या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते. CD या शाखेतील विद्युतधारा AB च्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेला वरील दिशेला ढकलते. अशा रीतीने कुंडल व आस घड्याळ्याच्या काट्यांच्या विरूद्ध दिशेने फिरू लागतात. अर्धे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे F आणि E या कार्बनब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. त्यामुळे DC या शाखेवर खालील दिशेने व BA या शाखेवर वरील दिशेने बल क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्धपरिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. व्यावसायिक चलित्रे याच तत्त्वावर चालतात

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×