Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- रौलट कायद्याविरोधी सत्याग्रही लढ्याने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले. १३ एप्रिल १९१९ हा बैसाखी या सणाचा दिवस होता. बैसाखीनिमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेत आयोजित केलेल्या सभेसाठी हजारो लोक जमले होते.
- त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नव्हती.
- जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावर भीषण गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारांवर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली.
- रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या ‘सर’ या पदवीचा त्याग केला.
shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
