मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. ब्राझीलची किनारपट्टी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

ब्राझीलची किनारपट्टी

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात.
  2. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल, तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्वकिनारा म्हणता येईल.
  3. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकँटिस या नदयांच्यादरम्यान तयार झाले आहे.
  4. ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळण व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टा आणि प्रवाळ बेटे यांमुळे रक्षण होते.
shaalaa.com
ब्राझीलची जलप्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ २३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
टिपा लिहा. | Q 3

संबंधित प्रश्‍न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ________.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.


पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?


टिपा लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे 


भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.


भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.


अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.


अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.


ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?


खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती?
  2. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते?
  3. उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
  4. साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते?
  5. उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.

वेगळा घटक ओळखा:

अमेझॉन नदीच्या उपनद्या


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×