मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. भारताचा द्वीपकल्पीय विभाग - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

भारताचा द्वीपकल्पीय विभाग

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो.
  2. भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
  3. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलगंणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्य भागात विंध्य-सातपुडा पर्वत आहेत.
  4. भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
shaalaa.com
भारताची जलप्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q ३. (ई) | पृष्ठ २३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
टिपा लिहा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×