मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. ब्राझीलच्या नकाशाचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते, की ब्राझीलच्या उत्तर व पूर्वेकडील किनाऱ्याला लागून अनुक्रमे उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक महासागर आहेत.
  2. ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे. उत्तरेकडे ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सर्वच नद्या भूउताराला अनुसरून सामान्यत: उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. ब्राझीलच्या उच्चभूमीवर उगम पावणारी सावो फ्रान्सिस्को ही नदी उत्तरेकडे वाहते, पुढे पूर्वेकडे वळून ती अटलांटिक महासागराला मिळते.
  3. याशिवाय, ब्राझीलमधील सर्वांत मोठी नदी 'ॲमेझॉन' ही सुद्धा ब्राझीलच्या पश्चिमेकडील पेरू या देशात असणाऱ्या अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते व उताराला अनुसरून ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते.
  4. तसेच, ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून उगम पावणाऱ्या पेराग्वे, पॅराना व उरुग्वे या नद्या ब्राझीलच्या नैऋत्येकडील भागातून वाहत जातात.
    ब्राझीलमधील नदीप्रणाली अभ्यासता ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
shaalaa.com
ब्राझीलची जलप्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ २३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
भौगोलिक कारणे लिहा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ________.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.


पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?


टिपा लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे 


टिपा लिहा.

ब्राझीलची किनारपट्टी


भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.


अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.


अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.


ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?


खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती?
  2. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते?
  3. उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
  4. साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते?
  5. उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.

वेगळा घटक ओळखा:

अमेझॉन नदीच्या उपनद्या


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×