Advertisements
Advertisements
प्रश्न
(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. काटकसर, भारनियमन हे सौम्य शब्द झाले. वास्तविक स्थिती मात्र खूप गंभीर आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये तर २४ तास वीज उपलब्ध असते, परंतु ग्रामीण भागात वीजपुरवठा १० ते १५ तास बंद राहतो. यामुळे ग्रामीण जनतेचे जीवन कठीण होते. शासन या समस्येवर उपाय न करता, यालाच उलट 'भारनियमन' असे आकर्षक नाव देते. दुसरीकडे, लोक सुसंस्कृततेच्या भ्रमामुळे 'आभार', 'सॉरी' अशा शब्दांचा अतिरेकी वापर करतात. वीजपुरवठ्यातील अपर्याप्तता आणि 'आभार' हे दोन वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत परंतु त्यांचा निर्देश करण्यासाठी आणि 'आभार' मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून 'भार' - 'आभार' या शब्दांची कोटी करीत लेखिकांनी 'आभारनियमन' हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______
पाठातील उदाहरणे शोधा.
| शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.
कारणे लिहा.

(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
आर्किटेक्ट -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
ऑपरेशन -
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सुसंस्कृतपणाचा कडेलोट
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
घाऊक आभार
‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.
