मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

स्वमत. संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

संध्याकाळच्या वेळी मावळणाऱ्या सूर्याची सोनेरी आणि पिवळसर-तांबडी किरणे सर्वत्र पसरली आहेत. तो नजराणा पाहून, एखादा ओढा जणू आपल्या प्रवाहातून वितळलेले सोनेच वाहून नेतो आहे असा भास होतो. झाडांच्या शेंड्यांवर पडलेल्या या प्रकाशामुळे त्यांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट परिधान केला आहे असे वाटते, तर संपूर्ण कुरणावर जणू गुलालाची उधळण झाली आहे. वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार भाताची शेते म्हणजे झोके घेणारे मखमली गालिचेच वाटतात. अशा या शेतांवर इंद्रधनुष्याच्या रंगांचे, तसेच सोनेरी, रुपेरी पंख असलेली फुलपाखरे आनंदाने भिरभिरत आहेत, तर काही फुलपाखरे भाताच्या लोंब्यांवर झोके घेत आहेत. इकडून तिकडे वेगाने उडणाऱ्या या फुलपाखरांना पाहून जणू त्यांना हिरे, माणके आणि पाचूचेच पंख लाभले आहेत असे वाटते. दिवसभर फिरून सर्व पक्षी आता चारापाणी घेऊन संध्याकाळच्या वेळी आपल्या झाडांवर परतले आहेत. अखेर, या संपूर्ण सृष्टीला आपल्या प्रकाशाने नटवणारा सूर्याचा तो सोन्याचा गोळा हळूहळू क्षितिजाआड सरकत अवकाशाच्या कुशीत विलीन झाला आहे.
shaalaa.com
सायंकाळची शोभा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: सायंकाळची शोभा - कृती [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 सायंकाळची शोभा
कृती | Q (७) (अ) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल!
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं!
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे! (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने!
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे!

कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.


कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

सोनेरी मुकुट घालणारी - ............


कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

साळीवर झोपणारी - ...........


कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

सोन्याचा गोळा - ...........


स्वमत.

सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×