Advertisements
Advertisements
प्रश्न
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
महिलांची एकजूट समाजातील विविध घटकांमध्ये सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, उदाहरणार्थ:
- लाटणे मोर्चा (१९७२): समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तूमिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.
- चिपको आंदोलन (१९७३): व्यापारी उद्देशासाठीच्या जंगलातील झाड तोडी रोखण्यासाठी चिपको आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि एकमेकांचे हात धरून त्यांना वेढून ठेवले. गौरादेवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली. त्यांना सुदेशादेवी, बचनीदेवी यांची मदत मिळाली.
- मद्यपानविरोधी आंदोलन (१९९२): आंध्र प्रदेशात महिलांनी दारूच्या वाढत्या समस्यविरुद्ध आवाज उठवला आणि राज्य सरकारने त्यांना साथ दिली.
ही आंदोलने खूप यशस्वी झाली आणि महिला एकजूट झाल्या तर समाजात सकारात्मक बदल कसे घडवून आणू शकतात हे कळले.
shaalaa.com
स्त्रीशक्तीचा आविष्कार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
