मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. राष्ट्रीय हितसंबंध - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रीय हितसंबंध

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधांत समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

  1. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे.
  2. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ७१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ७१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×