मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्रादेशिकता

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रादेशिकता

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
  2. भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते.
  3. प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा व तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी यांवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता जागृत होते.
  4. यातून आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे या हेतूपायी काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष, विविध दबाव गट अस्तित्वात येतात, चळवळी निर्माण होतात.
  5. आपल्या प्रदेशाच्या हिताचे जतन करणे हा ‘प्रादेशिकता’ निर्मितीमागील मुख्य हेतू असतो. आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच ‘प्रादेशिकता’ असे म्हणतात. 
shaalaa.com
राष्ट्रीय पक्ष
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: राजकीय पक्ष - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.3 राजकीय पक्ष
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (१)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.3 राजकीय पक्ष
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×