मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे- चूक

कारण- 

  1. 'शिरोमणी अकाली दल' हा पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९२० मध्ये झाली. हा पक्ष पंजाबमधील धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य देतो. 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता मिळवण्यासाठीचे निकष या पक्षाने पूर्ण केले आहेत.
  2. भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.
  3. संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.
  4. शिरोमणी अकाली दल हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.  
shaalaa.com
प्रादेशिक पक्ष
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: राजकीय पक्ष - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.3 राजकीय पक्ष
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (४)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.3 राजकीय पक्ष
स्वाध्याय | Q २. (४) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×