मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. ii) काढलेल्य

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.

i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.

iii)  काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे. 

बेरीज
Advertisements

उत्तर

नमुना अवकाश,

S = { 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20,
21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30,
31, 32, 33, 34, 35, 36}

∴ n(S) = 36

i) समजा, घटना A: काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

∴ A = {1, 4, 9, 16, 25, 36}

∴ n(A) = 6

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`

∴ P(A) = `6/36`

∴ P(A) = `1/6`

ii) समजा, घटना B: काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.

∴ B = {2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31}

∴ n(B) = 11

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`

∴ P(B) = `11/36`

iii) समजा, घटना C: काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे.

∴ C = {3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33, 36}

∴ n(C) = 12

∴ P(C) = `("n"("C"))/("n"("S"))`

∴ P(C) = `12/36`

∴ P(C) = `1/3`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - Q.४

संबंधित प्रश्‍न

एक फासा टाकला असता पुढील घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

कृती: समजा, ‘S’ नमुना अवकाश आहे. 

S = {1, 2, 3, 4, 5, 6} ∴ n(S) = 6

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

A = {______} ∴ n(A) = 3

P(A) = `square/("n"("S"))` ...........[सूत्र]

= `square/6`

∴ P(A) = `1/square`


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.


तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: एकही छापा न मिळणे.

ii) घटना B: कमीत कमी दोन छाप मिळणे.


दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

कमीत कमी एक छापा मिळणे.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

एक्का मिळणे.


1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.


एका फाशाच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला, तर वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×