मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर १

भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने:

  1. युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.
  2. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.
  3. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.
  4. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.
shaalaa.com

उत्तर २

मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करून हा अधिकार आणखी व्यापक केला आहे. याचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले.

  1. यामुळे, भारतामधील युवावर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाले.
  2. या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जात असून हा बदल केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक स्वरूपाचाही ठरला आहे.
  3. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आहेत.
  4. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही यामुळे बदलून लोकांच्या इच्छा-आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष स्पर्धेत दिसत आहेत.

अशारीतीने, युवा मतदारांच्या सहभागामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढली आहे. 

shaalaa.com
लोकशाही
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संविधानाची वाटचाल - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (१)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×