Advertisements
Advertisements
प्रश्न
कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेमध्ये पाऊस येण्यापूर्वीची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मानसिक घालमेल भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली आहे.
कडक उन्हाळ्यामुळे घरदार, शेते व परिसर यांची कशी वाताहत होते, याचे यथोचित वर्णन काही प्रतीकांमधून प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना कवयित्रींनी 'राक्षशीण पीठ कांडते' हे प्रतीक वापरले आहे. एखादी राक्षसी जशी जात्यावर पांढरेधोप पीठ काढते, त्याप्रमाणे कडाक्याचे ऊन भासते आहे. विहिरी आटल्या आहेत, हे सांगताना त्यांनी 'भिंगाचे' प्रतीक वापरले आहे. विहिरीमध्ये खोल तळाशी थोडेसे पाणी उरले आहे. त्यावर उन्हाची तिरीप पडल्यामुळे जण ते आरशासारखे चकाकते आहे. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत, हे सांगताना कवयित्रींनी 'बैल ठाणबंद' झाले, असे सार्थ प्रतीक वापरले आहे. एखादया योद्ध्याला जसे जेरबंद करून ठेवावे, तसे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे भीषण वास्तव सार्थ प्रतीकांतून कवयित्रींनी मांडले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकटी पूर्ण करा.
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा - _________
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.
चौकटी पूर्ण करा.
शेतात रमणारी व्यक्ती - _________.
कारण लिहा.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........
कारण लिहा.
बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............
कृती करा.
कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग
खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.
| प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी | प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी | प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी | मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी |
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
