Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
Advertisements
उत्तर
मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो, तो शेतकऱ्यांना! माती कसून, नांगरून, पेरणी करून त्यांनी अपार कष्ट केलेले असतात. त्या कष्टांचे फळ पावसानंतर मिळेल, या आशेने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते व मन आनंदाने मोहरून जाते. पावसानंतर ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच माणसांना आनंद होतो; कारण वर्षभराची पाण्याची चिंता मिटून जाते. पावसानंतर ग्रामीण भागात दुष्काळ पडण्याचे भीषण संकट टळते. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पावसानंतर मुबलक पाणी प्यायला मिळते. पशुपक्षी आनंदी होतात. पावसानंतर झाडांना नवीन लकाकी येते. डोंगरावर हिरवळ उगवते. तृषार्त जमिनीची तहान शरमाते. सृष्टी पावसानंतर पालवते, हिरवीगार होते. पावसानंतर चराचरात उत्साह संचारतो. धरतीचा तो पुनर्जन्म असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________
चौकटी पूर्ण करा.
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा - _________
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.
चौकटी पूर्ण करा.
शेतात रमणारी व्यक्ती - _________.
कारण लिहा.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........
कारण लिहा.
बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............
कृती करा.
कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
