मराठी

खालील दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा. ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणीक्षणभर बसला,

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यांत राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा

- कवी कुसुमाग्रज

  1. दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 3) 3
    1. पूरग्रस्त तरुणाचा काय मोडून पडला आहे?
      1. संसार
      2. पाय
      3. लढा
      4. कणा
    2. घरट्यात पाहुणी म्हणून कोण आली होती?
      1. मुलगी
      2. गंगामाई
      3. पाऊस
      4. गुरुजी
    3. आलेल्या परिस्थितीला तरुण कोणाला सोबत घेऊन लढतो आहे?
      1. आईला
      2. कारभारणीला
      3. आजीला
      4. बहिणीला
    4. कवी व कवितेतील पूरग्रस्त तरुण यांच्यात कोणते नाते असावे?
      1. वडील-मुलगा
      2. नातू-आजोबा
      3. शेजारी-शेजारी
      4. शिक्षक-विद्यार्थी
  2. दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्‍नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 4) 4
    1. प्रसाद म्हणून पाहुणीने पूरग्रस्त तरुणाला काय दिले?
    2. तरुण हसत हसत केव्हा उठला?
    3. पूरग्रस्त तरुणाने कोणती गोष्ट स्पष्टपणे नाकारली?
    4. गंगामाई चार भिंतीत कोणाप्रमाणे नाचून गेली?
    5. कवितेत कवीने कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
आकलन
Advertisements

उत्तर

    1. संसार
    2. गंगामाई
    3. कारभारणीला
    4. शिक्षक-विद्यार्थी
    1. प्रसाद म्हणून पाहुणीने (गंगामाईने) पूरग्रस्त तरुणाच्या पापण्यांमध्ये थोडे पाणी (अश्रू) ठेवले.
    2. कवीने (सरांनी) मदत करण्यासाठी खिशाकडे हात नेला, तेव्हा तरुण हसत हसत उठला.
    3. पूरग्रस्त तरुणाने पैशांची मदत घेण्याचे स्पष्टपणे नाकारले.
    4. गंगामाई चार भिंतीत माहेरवाशीण पोरीसारखी नाचून गेली.
    5. कवितेत कवीने पावसाळा (वर्षा) ऋतूचे वर्णन केले आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Set 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×