Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
| वृक्ष जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात. सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होताना दिसत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल’ अशी म्हण आहे, ती अगदीच त्याने सार्थ केली आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले; दुष्काळाचे प्रमाण वाढले; जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागले. जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबूड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळेल. जंगलतोड तर थांबली पहिजेच; पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत, जंगले वाढवली पाहिजेत. या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समाजावून सांगण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे. |
- दिलेला गद्य उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 3) 3
- वृक्षांची फळे-फुले कोणासाठी असतात?
- इतरांसाठी
- दुसऱ्यांसाठी
- स्वतःसाठी
- प्राण्यांसाठी
- मानवाने जंगलतोड करून काय निर्माण केले?
- हवेचे प्रदूषण
- कमी पाऊस
- वैराण वाळवंटे
- नापीक जमीन
- वृक्ष त्यागाच्या भावनेने कोठे उभे राहतात?
- उन्हात
- पावसात
- वाऱ्यात
- सावलीत
- पावसाचे प्रमाण कमी होण्यामागील मुख्य कारण कोणते?
- वाढती उष्णता
- नापीक जमीन
- वाढता दुष्काळ
- बेसुमार जंगलतोड
- वृक्षांची फळे-फुले कोणासाठी असतात?
- दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) 3
- निसर्गाला चक्र दुरुस्त करण्याची संधी केव्हा मिळेल?
- त्यागमय जीवन जगणाऱ्या वृक्षाला लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
- बेसुमार वृक्षतोडीमागील कोणती कारणे वरील उताऱ्यात आली आहेत?
- गद्य उताऱ्यानुसार कोणत्या गोष्टींसाठी मानवाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे?
- दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 1) 2
- ‘वृक्ष हा उपकारकर्ता’, कसा ते सांगा.
- बेसुमार वृक्षतोडीमुळे मानवाला कोणकोणते दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, स्पष्ट करा.
आकलन
Advertisements
उत्तर
-
- दुसऱ्यांसाठी
- वैराण वाळवंटे
- उन्हात
- बेसुमार जंगलतोड
-
- जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबूड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळेल.
- त्यागमय जीवन जगणाऱ्या वृक्षाला लेखकाने ‘सत्पुरुषाची’ उपमा दिली आहे.
- जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी मानवाने बेसुमार वृक्षतोड केली आहे, ही कारणे उताऱ्यात आली आहेत.
- गद्य उताऱ्यानुसार पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी मानवाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
-
- वृक्ष अत्यंत त्यागी वृत्तीने जीवन जगतात. ते स्वतः कडक उन्हात उभे राहून इतरांना शीतल सावली देतात. त्यांची फळे आणि फुले देखील स्वतःसाठी नसून दुसऱ्यांच्याच उपयोगासाठी असतात. संकटाच्या वेळी ते मानवाला आसरा देतात आणि स्वतः झिजून इतरांचे कल्याण करतात. या निस्वार्थी आणि परोपकारी गुणामुळे वृक्षाला ‘उपकारकर्ता’ म्हटले आहे.
- मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून खालील गंभीर दुष्परिणाम झाले आहेत:
- जगभरातील तापमानात कमालीची उष्णता वाढली आहे.
- पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून वारंवार दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
- जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन सुपीक जमिनी नापीक बनल्या आहेत.
- हवेचे प्रदूषण वाढले असून मानवाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- हिरवीगार जंगले नष्ट होऊन वैराण वाळवंटे निर्माण झाली आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
